Ad will apear here
Next
माडिया भाषेतील पहिल्या पुस्तकाची निर्मिती
‘माडिया शिकू या’ पुस्तकाचे एक जुलैला प्रकाशन
पुणे : महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बस्तर भागातील आदिवासींच्या ‘माडिया’ भाषेतील लिखित स्वरूपातील पहिले पुस्तक पुणे विद्यापीठातील जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. मंजिरी परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे. 

‘माडिया शिकू या’ असे या पुस्तकाचे नाव असून, त्याचे प्रकाशन सोमवारी, एक जुलै रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते होणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव मनीषा वर्मा, आदिवासी संशोधन संस्थेचे आयुक्त किरण कुलकर्णी या वेळी उपस्थित असतील.

माडिया भाषेला लिपी नाही. त्यामुळे तिचे लिखित दस्तऐवजीकरण झालेले नव्हते. त्यामुळे ही भाषा अस्तंगत होत चालली आहे. महाराष्ट्राला आणि जंगलाबाहेर पडल्याने स्वतःची भाषा विस्मरणात गेलेल्या माडियांच्या नव्या पिढीला या भाषेची ओळख व्हावी, या भागात शिक्षण देण्याचे काम करणाऱ्यांना आणि ही भाषा शिकू इच्छिणाऱ्या लोकांना उपयोग व्हावा या उद्देशाने डॉ. मंजिरी परांजपे आणि त्यांच्या सहकारी मैथिली देखणे-जोशी, ऋजुता टिळेकर आणि ख्रिस्तीन फरायरा यांनी या भागात जाऊन तिथल्या आदिवासी लोकांशी संवाद साधून अत्यंत कष्टाने माडिया भाषेतील हे पहिले पुस्तक निर्माण केले आहे. 

या पुस्तकातील सर्व उतारे, संवाद श्राव्य स्वरूपातही उपलब्ध आहेत. त्यामुळे या भाषेतील शब्दांचे उच्चार समजून घेणे शक्य होणार आहे. त्याचा एक पेनड्राइव्ह पुस्तकासोबत देण्यात येणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZGQCB
 Great Work. Congratulation Dr. M. Paranhape !
 Manjiri tuze va tuzya teamche khup khup koutuk.Mala tuza khup abhiman vatato.
 I do not know how to express my admiration and respect for the
effort . Hope , many libraries buy it . And linguists .
 This will remain -- a book for specialists studying languages , and
historians . It deserves to preserved . Only libraries subsidised by
public funds can afford to do this .
Similar Posts
आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेसाठी पाठ्यपुस्तके तयार व्हावीत : डॉ. प्रकाश आमटे पुणे : ‘देशाच्या लोकसंख्येत दहा टक्के असणारा आदिवासी समाज एके काळी जंगलाचा राजा होता. या समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी शिक्षणाची गरज आहे; मात्र शिक्षण घेताना भाषा हीच त्यांच्या समोरची मुख्य अडचण आहे. ‘माडिया शिकू या’ या पुस्तकाच्या माध्यमातून ही अडचण दूर होण्यास मदत होईल. अशी पुस्तके
‘लोकबिरादरी’साठी ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’ पुणे : हेमलकसा (गडचिरोली) येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील जखमी वन्यप्राण्यांच्या अनाथालयाच्या मदतीसाठी येथील लोकबिरादरी मित्रमंडळातर्फे ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स- सीझन ३’ या विशेष कार्यक्रमाचे सलग तिसर्‍या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.
दहावीतही मुलींचीच बाजी आणि कोकण विभागच अव्वल पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून, ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आज (आठ जून) दुपारी एक वाजता mahresult.nic.in या संकेतस्थळासह अन्य काही संकेतस्थळांवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language